कोकीळ आणि ससाणा

एक भुकेलेला ससाणा भक्ष्यासाठी फिरत असता, त्याच्या हाती एक कोकीळ सापडला. तो कोकीळ त्यास म्हणतो, ‘दादा, मला सोड. मी इतका लहान आहे की, मला खाल्ल्याने तुझे पोट खचित भरणार नाही. शिवाय मी चांगला गाणारा आहे, तरी मला सोडून देऊन माझे गाणे घटकाभर ऐकशील तर तेणेकरून तुला मोठा आनंद होईल’ ससाणा उत्तर करितो, ‘तू कितीही लहान असलास तरी माझ्यासारख्या भुकेलेल्या प्राण्यास तुझ्या मांसाचा पुष्कळ उपयोगी होईल; शिवाय हाती सापडलेला लहान पक्षी देऊन मोठा पक्षी पकडण्याच्या नादी लागण्याइतका मी खचितच मुर्ख नाही !’

तात्पर्य:- हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे हा मूर्खपणा होय.