कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हा

राजर्षी शाहूंची कर्मभूमी महणून कोल्हापूर जिल्हा पुरोगामी महाराष्ट्रास ज्ञात आहे. कोल्हापूर संस्थानाच्या या अधिपतीस महाराष्ट्रातील बहुजन समाजाने आपले दैवतच मानले आहे. शाहूंचा जन्मही कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या घाटगे घराण्यात झाला असल्याने एका अर्थाने कोल्हापूर जिल्हा ही शाहूंची जन्मभूमीही आहे.

राजर्षी शाहूंनी स्थापन केलेली शाहू मिल, त्यांनी वसविलेली शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ व त्यांनी बांधलेले राधानगरी हे धरण आजही त्याची स्मृती तेवत ठेवीत आहेत. संतकवी मोरोपंत, ‘ययाती’कार वि. स. खांडेकर, माधव, ज्युलियन, ना. सि. फडके, ‘गीतरामायण’ कार ग. दि. माडगूळकर, ‘मृत्युंजय’काअ शिवाजी सावंत, ‘स्वामी’कार रणजित देसाई याची प्रतिभा येथे बहरली- त्यांचे साहित्य येथेच फुलले.

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज बाबूराव पेंटर यांनी आपल्या ‘सैरंध्री’ या चित्रपटाद्वारे चित्रपट व्यवसायाची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली. प्रभात कंपनीही येथेच उदयास आली. मा. विठ्ठल, मा. विनायक, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, यांसारख्या चित्रपटमहर्षीची कलाकारकीर्द येथेच फुलली-बहरली. पुढील काळातही कोल्हापुराने ही परंपर जोपासली. आज महाराष्ट्रातील ‘चित्रगगरी’ हे स्थान कोल्हापुरात प्राप्त झाले आहे. गानसम्राज्ञी, महाराष्ट्रभूषण लता मंगेशकर याही या मातीचीच देणगी होत.

1 thought on “कोल्हापूर जिल्हा

  1. Pingback: १ जून दिनविशेष | June 1

Comments are closed.