कोळी आणि त्याचे दैव

एका कोळ्याने पुष्कळ वेळा पाण्यांत जाळे टाकिले, परंतु त्यास एकही मासा मिळाला नाही. मग निराश होऊन त्याने आपली आउते गोळी केली आणि आता तो घरी जाण्यास निघणार, इतक्यात एक मोठा थोरला मासा आपोआप उडी मारून त्याच्या टोपलीत येऊन पडला. ते पाहून त्या कोळ्यास आंनद झाला असेल !

तात्पर्य:- पुष्कळ प्रयत्न करूनही जी गोष्ट सिद्धीस जात नाही, ती केव्हा केव्हा आपोआप घडून येते. पण असे क्वचितच घडते.