कोयीची सुपारी

साहित्य:

  • पिकलेल्या आंब्याच्या सात/आठ कोयी
  • शेंदेलोण
  • पादेलोण

कृती:

आंब्याचा रस काढून उरलेल्या कोयी तीन दिवस उन्हात वाळवाव्यात. या कोयी उभ्या धरून फोडाव्यात. आतील गर घेऊन त्यात तो बुडेल इतके पाणी व तीन चमचे मीठ घालून कुकरमध्ये २ शिट्टय़ा कराव्यात. थंड झाल्यावर पाणी निथळून घ्यावे. कोयींचे पातळ काप करावेत. त्याला शेंदेलोण, पादेलोण लावून उन्हात वाळवाव्या.