कुर्‍हाड आपल्याच पायावर

जागतिक लोकसंख्या दिन

११ जुलै २००१ जागतिक लोकसंख्या(World Population Day) दिननिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत भारताचे रजिस्ट्रार जनरल जे.के. बंठिया यांनी जनगणना २००१ ची अंतिम आकडेवारी जाहीर केली. भारताची लोकसंख्या १०२ कोटी ८० लाख होती. २००९ मध्ये भारताची लोकसंख्या १ अब्ज १६६ लाख ०७९ हजार २१७ एवढी झाली असून लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर १.५४८ टक्के आहे. म्हणजेच १ मुलं जन्माला येते.

म्हणजे लोकसंख्येचा स्फोट कसा असतो हे भारताच्या माध्यमातून संपूर्ण जग पाहत आहे. या स्फोटाची तीव्रता वाढविणारी मानसिकता भारतीय माणूस पोसत आहे. वेगळ्या अर्थाने तो दुर्दैवाचा मुद्दा येथे मांडायचा आहे, तो म्हणजे स्त्रीला नाकारण्याचा. अर्थात वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा हा अनाठायी हट्ट ! भारतात मुलींचे कर्तृत्व नाकारण्याचा अपराध जोपर्यंत थांबत नाही. तोपर्यंत त्या अर्थाने नैसर्गिक समतोल कसा काय राखला जाऊ शकतो याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.

०-१४ वर्षांच्या वयोगटात पुरुषांची संख्या १ हजार आणि महिलांची संख्या ९०० आहे. १५ ते ६४ वर्षांच्या वयोगटात पुरूषांची संख्या १ हजार आणि महिलांची ९०५ आहे. तर महाराष्ट्रात पुरूषांच्या तुलनेत २००१ च्या जनगणनेनुसार हजारी पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९२२ इतके आहे. विशेषतः विकसित जिल्ह्यांमध्ये म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अधिक चिंताजनक आहे. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षात गर्भजल परीक्षा आणि त्यातून स्त्री भ्रूणहत्येची समस्या, वंशाचा दिवा मुलगाच असवा ही पारंपरिक मानसिकता जितकी कारणीभूत आहे, तितकीच गर्भातील बाळ मुलगा की मुलगी हे पाहण्यासाठी सोनोग्राफीसारख्या अत्याधुनिक तंत्रांची उपलब्धता हेही कारण आहे. विकसित जिल्ह्यांमध्ये या सुविधा सहजासहजी उपलब्ध होत असल्याने तसेच याकरिता पैसे खर्च करण्याची लोकांची तयारी असल्याने या भागात स्त्रियांचे प्रमाण झपाट्याने घटताना दिसते. विशेषतः यामध्ये सोनोग्राफी करून घेणाऱ्यांपैकी आणि या क्षेत्रातील वैद्यकीय व्यावसायिक या दोघांचे हितसंबंध गुंतले असल्यामुळे कायद्यातून पळवाटा शोधण्याचा नवनवा मार्ग अवलंबला जातो.

तसं पाहता हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्त्री ही आयुष्यात सुरवातीला वडिलांची नंतर नवऱ्याची त्यानंतर मुलाची जबाबदारी असल्याचे दिसते. म्हणजे तिचे आयुष्य या तीन पुरूषांभोवती फिरते. शहरी-ग्रामीण गृहिणी नोकरदार कोणत्याही गटात मोडणारी घेतली तर असे दिसून येते. घर हे पूरूषांपेक्षा स्त्रियांवर जास्त अवलंबून असते. कित्येक घरांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात स्त्रीने घराचा संपूर्ण डोलारा सांभाळलेला असतो. घरातला पुरूषवर्ग उद्योग न करता घर नीट चाललेले असते. हे केवळ परातल्याच स्त्रीमुळे; तरीही स्त्रियांचा जन्मदर कमीच आहे.

कारण या स्त्री भ्रूणहत्येचे सामाजिक आणि नैसर्गिक परिणाम फार भीषण आहे. ज्याची आता केवळ कल्पनाच केली जाऊ शकते. २१ व्या शतकासुद्धा मुलांना लग्नासाठी मुली मिळण्याचा प्रश्न काही समाजामध्ये गंभीर स्वरुप धारण करु लागला आहे. मुलगी नकोच असा प्रत्येकाने स्वरुप धारण करु लागला आहे. मुलगी नकोच असा प्रत्येकाने केलेला विचार हाच यामागे कारणीभूत आहे. तेव्हा लग्नाची समस्या म्हणूनच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या हा डासळाणारा तोल फार गंभीर ठरत जाणार आहे. स्त्रियांचा छळ, हुंडाबळी, बलात्कार, शोषण, गर्भपात, विनयभंग, अपहरण, लैंगिक छळ अशा गुन्ह्यांमुळे स्त्रियांचा आवाज क्षीण झालेला आहे. भ्रूणहत्येने तर तो जीव बाहेर येण्याआधीच त्याचा आवाज दाबून टाकला जातो. २१ वे शतक तरुणांचे मानले जात असल्यामुळे शाळा-कॉलेजांमध्ल्या मुला-मुलींना यासंबंधीच्या प्रबोधनाचे सूत्रधार बनायला हवे. नुसते मुलगी चालेल असे म्हणण्याचा आग्रह न धरता मुलगीच हवी अशी जबरदस्त प्रेरणा तरुण मुला-मुलींत निर्माण करायला हवी. मुलगी असल्याचे नैसर्गिक फायदे मुलींपर्यंत पोहोचायला हवेत. मुलगाच हवा असा आग्रह धरणे जोपर्यंत सामाजिक अप्रतिष्ठेचे होत नाही, तोपर्यंत काही काळात जर आपण हे पावले उचलली नाहीत तर मुलगी जातच दुर्मिळ होत जाईल. यासाठी शासनाने विविध प्रसिद्धी माध्यमांतून जनजागरण करणे, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मुलगी वाचवा यासारख्या मोहिमा राबवणे, जनता, लोकप्रतिनिधी आणि प्रसिद्धीमाध्यमे यांच्या सहकार्याने समस्यांवर मात करणे गरजेचे आहे. नाही तर स्त्री भ्रूणहत्या करुन आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे होईल.