पारशी पद्धतीचे लगन नु कस्टर्ड

साहित्य :

  • ३ कप दूध
  • ३ अंडी
  • १०० ग्रॅम साखर
  • अर्धा कप क्रीम किंवा घोटलेली साय
  • अर्धा चमचा वेलचीपूड
  • अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स
  • २ चमचे काजू
  • बदामाचे काप (ऐच्छिक)

कृती :

पारशी पद्धतीचे लगन नु कस्टर्ड

पारशी पद्धतीचे लगन नु कस्टर्ड

दूधात तीन चमचा साखर घालावे. दूध उकळते ठेवावे.

आटवून २ कप राहिले की, उरलेले साखर त्यात घालावी. साखर विरघळेपर्यंत चुलीवर ढवळावे.

त्यात साय व हवे असल्यास काजू, बदामाचे काप घालून दोन मिनिटे उकळावे.

खाली उतरवून निवाले की वेलचीपूड घालावी. अंडी फोडून त्यात पांढरे व पिवळे करावे.

पिवळे भाग काट्याने फेसावा व त्यात व्हॅनिला घालावा.

पांढरा खूप फेसावा व दोन्ही फेसलेले भाग दुधात मिसळावे.

एका बेकिंगच्या भांड्याला लोण्याचा हात फिरवावा व त्यात हे मिश्रण इंचभर रुंदभर येईल अशा बेताने ओतावे.

मध्यम ओव्हनमध्ये सुमारे २५ मिनिटे भाजावे.