लहान मासा आणि मोठा मासा

एक मोठा मासा एका लहान माशास मारून खाण्यासाठी त्याच्या मागे लागला असता तो लहान मासा आपला जीव वाचविण्यासाठी उथळ पाण्यात शिरला. परंतु तेथेही मोठा मासा आलेला पाहून त्याने किनाऱ्याकडे धाव घेतली व अगदी कडेवर येताच लाटांच्या जोराने तो वाळवंटावर येऊन पडला. त्याच्या मागे तो मोठा मासा होताच, तोही त्याचा पाठलाग करण्याच्या गडबडीत, लाटांच्या तडाक्यात सापडून किनाऱ्यावर जाऊन पडला. मग ते दोघेही मृत्युपंथास लागले असता, तो लहान मासा आपल्याशीच म्हणतो, ‘मी जसा मरतो आहे तसाच माझा शत्रूही मरतो आहे, हे पाहून मी आता सुखाने प्राण सोडीन.’