लाजून हांसणे अन्‌

लाजून हांसणे अन्‌ हांसून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे ॥धृ॥

डोळ्यास पापण्यांचा कां सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन्‌ कां चंद्रही दिसावा ?
हे प्रश्न जीव घेणे, हरती जिथे शहाणे ॥१॥

हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसें कळावे
हृदयांत बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे ॥२॥

जाता समोरुनी तूं उगवे टपोर ताता
देशांतुनी फुलांच्या आणी सुगंधवारा
रात्रीच चांदण्याचे सुचते सुरेल गाणे ॥४॥

One thought on “लाजून हांसणे अन्‌

Comments are closed.