साहित्य:
- २५० ग्रॅम टॉमेटो
- २ फूल लसूण
- १/२ लहान चमचा जीरे
- १ लहान चमचा मीठ
- २ लहान चमचे धणे पावडर
- १ लहान चमचा लाल तिखट
- २ लहान चमचे तूप
कृती:
टॉमेटो चे बारीक तुकडे करा. लसूण सोलून घ्या. टॉमेटो व लसूण मिक्सरमधे पिसून घ्या. एका भांड्यात तूप गरम करा व जीरे टाका. जीरे भाजून धणे पावडर, लाल तिखट, मीठ व पिसलेला टॉमेटो-लसूण टाका. थोडा वेळ हलवत-हलवत शिजवा. चटणी घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. गार झाल्यावर वाढा, लसूण खाणार्यासाठी तर ही मेजवानी आहे.
टिपः ही चटणी ८-१० दिवस टिकवता येईल. पण पाणी अजिबात न टाकता.