Category Archives: महाराष्ट्रातील जिल्हे

महाराष्ट्रातील जिल्हे | Districts of Maharashtra State

अकोला जिल्हा

अकोला जिल्हा

अकोला जिल्हा

अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराने अकोला शहर वसविल्याचे सांगितले जाते. नर्नाळ्याच्य सुभ्याचा अकोला हा एक परगणा असल्याचा उल्लेख ‘ऐन-ई-अकबरी’त आढळतो.

२२ कि. मी. क्षेत्रावर पसरलेला सदुसष्ट बुरूज व सत्तावीस दरवाजे असलेला नर्नाळ्याचा इतिहासप्रसिद्ध किल्ला याच जिल्ह्यात गाविलगडच्या डोंगररांगांत पहुडलेला आहे.

अनुकूल हवामान व मृदा यांमुळे हा जिल्हा आज कापसाचे आगरच ठरला आहे. त्यामुळेच की काय, विदर्भाचे कृषी विद्यापीठ- पंजाबराव कृषी विद्यापीठ- येथेच स्थापन झाले आहे.

अकोट, तेल्हारा बाळापूर, मुर्तिजापूर, वाशिम, मंगरूळपीर, बार्शी टाकळी ही सर्व प्रसिद्ध कापूसकेंद्रे याच जिल्ह्यातील.

‘शंकरपट’ म्हणजे बैलांच्या शर्यतीत धावणाऱ्या धष्टपुष्ट बैलांसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे.