मला अशी गिऱ्हाइके मिळतात

एका टॅक्सीड्रायव्हरला त्याचा मित्र म्हणाला, ‘अरे तुझ्या टॅक्सीत माझ्या बैठकीवर कुणाचं तरी पैशांच पाकीट पडलयं !’

टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला, ‘ते तसचं राहू दे. मी मुद्दामच ते तिथ ठेवलयं. ते पाकीट असं मागच्या बैठकीवर ठेवून, मी माझी टॅक्सी रस्त्याच्या बाजूला उभी करतो. आतलं पाकीट पाहून लोभी गिऱ्हाईक त्याला टॅक्सीतून कुठेतरी जायला सांगतात पण आत पैसे नसल्याचे पाहून मुद्दाम प्रामाणिकपणा दाखविण्यासाठी – गिऱ्हाइक ते पाकीट मला परत करतं. अशा तऱ्हेनं ते माझं पाकीट माझ्या जवळचं राहतं, आणि मुख्य म्हणजे मला सबंध दिवसभर अखंड गिऱ्हाइके मिळत राहतात.’