मला तू पहावे

मला तू पहावे, तुला मी पहावे
फुलांना जराशी, खुशाली पुसावे

कसा गंध आला, तुझ्या या कळ्यांचा
तुझ्या गंध गावी, मला तू पहावे.

कसे नाव घेता, अता त्या मनीचे
जरा आसवांना विचारीत जावे.

मला हाक देतो, अता सांजवारा
जली आठवांना, सभेटून जावे.

इथे आसवांचा, सखे रोज चाळा
तुझ्या सावलीला, सदा मी रहावे.