माळेगाव खंडोबा

(जि :- नांदेड महाराष्ट्र)
सदर देवस्थान खंडोबा माळेगाव यात्रा म्हणून प्रसिद्धिस आहे. सदरचे देवस्थान हे हेमाडपंथी असून ते १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. तेथील लोकसंख्या २५०० आहे.सदर देवस्थानचा उत्सव मार्गशीर्ष अमावास्येच्या अगोदर २ दिवस व नंतर ३ दिवस असा ५ दिवस चालतो. त्यावेळेस देवस्थानचा छबिना निघतो. यात्रेमध्ये ३ दिवस पुरणपोळीचा महाप्रसाद असतो. प्रतिवर्षी यात्रेचा खर्च सुमारे रु.३०.००००/- पर्यंत होतो व हा खर्च भाविकांच्या देणगीतून केला जातो. तेथील छबिना दसरा, चंपाषष्ठी व मार्गशीर्ष अमावास्या या दिवशी निघतो. त्यातील मार्गशीर्ष अमावास्येच्या मुख्य यात्रेत कुस्तीचे फड होतात. उंट, घोडा यांच्या शर्यती होतात. जनावरांचे प्रदर्शन भरते. तसेच भजन, कीर्तन, गायन आदी कार्यक्रम होतात देवस्थानचे ४ पुरारी असून प्रत्येकास १ वर्ष या क्रमाने त्यांना पूजेचा मान मिळतो.

जाण्याचा मार्ग :-

महाराष्ट्रातील जिल्हा नांदेड, तालुका लोहा. लातूर-नांदेड रस्त्यावर माळेगाव आहे.