माळी व त्याचा कुत्रा

एका माळ्याचा कुत्रा विहीरीच्या काठी उडया मारीत असता, तोल जाऊन विहीरीत पडला. त्याची ओरड ऐकून माळी त्यास वर काढण्यास गेला. तो विहीरीत उतरून कुत्र्यास वर काढण्याचा प्रयत्न करीत असता, तो कुत्रा त्याच्या हातास चावला. या कृतघ्नपणाबद्दल माळ्यास त्या कुत्र्याचा इतका राग आला की त्याने त्यास विहिरीत तसेच सोडून दिले व त्यामुळे तो कुत्रा काही वेळाने बुडून मरण पावला.

तात्पर्य:- कृतघ्न मनुष्य मरू लागला असताही, त्याची कोणास दया येत नाही.