मालपुर्‍या

साहित्य :

  • १ वाटी मैदा
  • १ वाटी साखर
  • अर्धी वाटी ताक
  • अर्धी वाटी दूध व पाणी एकत्र
  • १ मोठा चमचा रवा
  • २-३ थेंब खाण्याचा केशरी रंग किंवा थोडे केशर
  • तळण्यासाठी तूप

कृती :

मैदा, रवा, साखर, ताक व दूधपाणी एकत्र मिसळावे. चांगले ढवळून सकाळी भिजवावे. संध्याकाळी चार वाजता फ्राइंग पॅनमध्ये तळहाताएवढी छोटी छोटी धिरडी घालावी. दोन्ही बाजूंनी परतून काढावी.

मधल्या वेळेसाठी किंवा टिव्ही जेवणात एक सोपा पदार्थ!