मनुष्य आणि त्याचा लाकडी देव

पण फार श्रीमंत व्हावे अशी इच्छा करणारा एक गरीब मनुष्य, एका लाकडी मूर्तीपुढे बसून त्या देवाची प्रार्थना करीत असे. ह्याप्रमाणे पुष्कळ दिवस गेले तरीही तो मनुष्य श्रीमंत झाला नाही, उलट त्याची गरिबी वाढतच चालली. मग एके दिवशी त्यास इतका संताप आला की, त्याने त्याच्या भरात त्या देवाच्या मूर्तीचे पाय धरून तिला जमिनीवर आपटले व तिचे तुकडे केले. मूर्ति फुटताच तिच्या आत पुष्कळ मोहोरा होत्या त्या सगळ्या बाहेर पडल्या. तो देखावा पाहून आश्चर्यचकित झालेला तो गरीब मनुष्य आपल्याशीच म्हणतो ‘जो देव मार बसला असताच प्रसन्न होणार, त्याची इतके दिवस मी प्रार्थना केली, हा माझा कोण वेडेपणा !’


तात्पर्य:- जेथे सामाने कार्यभाग होत नाही तेथे एखादे वेळी शक्तिच उपयोगी पडते.