मसुराच्या डाळीची बर्फी

साहित्य :

  • ५०० ग्रॅम मसुराच्या डाळीचा रवा
  • १ नारळ
  • १ कप दूध
  • ५०० ग्रॅम साखर
  • ७-८ वेलदोड्याची पूड
  • ७-८ बदामाचे काप
  • तूप.

कृती :

नारळाचे खोबरे मंदाग्निवर भाजून घ्या. नंतर ताटात ओतून ठेवा. नंतर त्याच पातेल्यात तुपावर रवा भाजून घ्या. रवा भाजून झाला की त्यावर दुधाचा शिपका द्या.साखर बुडेपर्यंत पाणी घाल. नंतर त्याचा दोनतारी पाक करा. त्यात भाजलेला रवा, खोबरे व वेलदोड्याची पूड घाला. मिश्रण कडेपासून सुटायला लागले की, खाली उतरवून घोटा व थाळीत जाड थापा. थंड झाल्यावर वड्या पाडाव्या.