मसूर डाळीची शेव

साहित्य :

  • २ फुलपात्रे मसुराची डाळ
  • १ फुलपात्रात हरभऱ्याची डाळ
  • तिखट
  • मीठ
  • ओव्याची पूड.

कृती :

दोन्ही डाळी एकत्र करून दळून आणा.नंतर त्यात तिखट, मीठ व ओव्याची पूड घाला. २ कांदे किसून त्याचे पाणी बाजूला काढा व कांद्याच्या पाण्यात वरील पीठ भिजवून नेहमीप्रमाणे शेव करा. हळद घालू नये.