मटाराची भजी

साहित्य :

 • दीड किलो मटार
 • ४ हिरव्या मिरच्या
 • ५ लसूण पाकळ्या
 • अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
 • २ मोठे कांदे
 • १ इंच आले
 • अर्धा चमचा लाल तिखट
 • चवीनुसार मीठ
 • १ चमचा गरम मसाला
 • १ चमचा आमचूर
 • ५ चमचे मैदा व डाळीचे पीठ
 • अर्धा चमचा ओवा
 • तळणीसाठी तेल.

कृती :

मटाराची भजी

मटाराची भजी

मटार सोलून थोडेसे पाणी घालून जाडसर वाटावेत, आले सोलून किसावे. कांदा बारीक चिरावा. आले, लसूण व एक कांदा बारीक वाटून घ्यावा.

३ मोठे चमचे तेल तापवावे. त्यावर वाटलेले मटार व मसाला एकत्र करून फोडणीस टाकावे. खूप ढवळून त्यात तिखट, गरम मसाला, आमचूर व मीठ घालावे.

पाच मिनिटे चुलीवर शिजवावे व नंतर खाली उतरवावे.त्यात चिरलेली कोथिंबीर घालावी. हिरव्या मिरच्या व दुसरा कांदा बारीक करून त्यात मिसळावा.

मिश्रण कालवून त्याचे लहान चपटे गोळे करावे. मैदा व डाळीचे पीठ एकत्र करून त्यात थोडे मीठ व पाणी घालावे.

डाळीचे पीठ न घालता नुसता मैदा वापरला तरी चालते. (पण डाळीचे पीठ घातल्यास ओवा घालावा. चव चांगली येते.) मैदाचे जरा सरसरीत व पातळ पीठ कालवावे. या मिश्रणात भजी बुडवून जरा निथळून कडकडीत तेलात तळावीत.