मेथीची रोटी

साहित्य :

  • ३ वाट्या बारीक चिरलेली मेथीची पाने
  • १ वाटी डाळीचे पीठ
  • ३ पिकलेली केळी
  • ४-५ चमचे तेलाचे मोहन
  • पाव चमचा हळद
  • १ चमचा मीठ
  • १ चमचा तिखट
  • कणिक
  • पाव चमचा हिंग
  • तूप

कृती :

मेथीची रोटी

मेथीची रोटी

मेथी धुवून फडक्यावर पसरावी व कोरडी होऊ द्यावी. केळी बारीक कुस्करावी. त्यात मेथी, तिखट, मीठ, हळद, हिंग, डाळीचे पीठ घालून मिसळावे.

तेल कडकडीत तापवून त्यात ओतावे. या मिश्रणात मावेल तितकी कणिक थोडीथोडी घालत घट्ट पीठ भिजवावे. पाणी अजिबात वापरू नये.

थोडा वेळ झाकून ठेवावे व नंतर त्याच्या भाकरीपेक्षा जरा पातळ अशा पोळ्या लाटाव्या. तव्यावर भाजून शेवटी थोडेसे तूप सोडावे व चुरचुरीत परताव्यात.

ताटात पसरून ठेवाव्यात व निवाल्यावर डब्यात भराव्यात. ट्रिपसाठी हा पदार्थ सोयीस्कर आहे.