म्हैसूर

साहित्य :

  • १ वाटी डाळीचे पीठ
  • २ वाट्या साखर
  • ३ वाट्या पातळ डालडा
  • ४-५ वेलदोड्यांची पूड
  • चिमूटभर खायचा सोडा.

कृती :

साखरेत दीड वाटी पाणी घालून एकतारी पाक करून ठेवावा. तूप कडकडीत तापून घावे व गरम असावे.एकतारी पाकात पीठ टाकूनसतत हलवत रहावे. नंतर त्यात गरम तूप घालत रहावे. गुलाबी रंगावर आले की सोडा घालावा व थाळीत ओता. वरून पाण्याचा शिपका द्यावा म्हणजे जाळी चांगली पडेल. लगेचच वड्या पाडाव्यात व थाळी जरा कलती करून थेवावी. म्हणजे तूप जास्तीचे बाहेर येईल.