म्हातारे मांजर आणि उंदीर

एक मांजर इतके म्हातारे झाले की, उंदराच्या मागे लागून त्यांची शिकार करण्याचे सामर्थ्य त्यास राहिले नाही. मग उंदीर पकडण्याची सोपी युक्ति त्याने योजिली. घरात धान्याची पोती ठेवली होती, त्यातील धान्य खाण्यास रात्री उंदीर येत असत, हे लक्षात घेऊन, ते मांजर एका पोत्याच्या आड, उंदरांची वाट पाहात लपून बसले. हा प्रकार, जवळच एक म्हातारा उंदीर बसला होता त्याने पाहिला व इतर उंदरांस कळविला. त्यामुळे एकही उंदीर त्या रात्री पोत्याजवळ आला नाही. अशा रीतीने त्या मांजराची ती युक्ति फुकट गेली.

तात्पर्य:- लुच्चेगिरी कितीही चातुर्याने केलेली असली, तरी ती बहुधा उघडकीस आल्याशिवाय राहात नाही.