मिष्ठी दोही गोड दही

साहित्य :

  • ५ कप दूध
  • दीड चमचा दही
  • १ वाटी साखर
  • २ मोठे चमचे पाणी

कृती :

प्रखर आंचेवर दूध आठवाए. निम्मे झालि की उतरवून बाजूला ठेव्वावे. दुसऱ्या जाडा बुडाच्या पातेल्यात साखर व पाणी घालावे. साखर विरघळली की आंच मंद करावी व ढवळत राहावे पाक जरा बदामी रंगावर होऊ लागला की उतरवावा व आटीव दुधात घालावा. नीट मिसळावे. सुबक कांचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात दूध ओतावे. कोमट झाले की त्याता दही घालून मिनिटभर ढवळावे व रात्रभर झांकून ठेवावे. दिवसा विरजण घातले असल्यास किमान ६-७ तास तरी लागतील. दही तयार झाले की फ्रीजमध्ये ठेवावे व पुडिंग म्हणून थंडगार झाल्यानंतर खायला द्यावे. मातीच्या भांड्यात दही विरजले तर त्याला वेगळाच छान वास येतो.

जड जेवणानंतर हे हलके पुडिंग सर्वांना जरून आवडेल.