मिस्सी रोटी

साहित्य:

  • १ वाटी कणिक
  • १ वाटी बेसन
  • १/२ लहान चमचा ओवा
  • १ चिमुट हिंग
  • १/२ लहान चमचा लाल तिखट
  • १/२ लहान चमचा मीठ
  • तूप गरजेप्रमाणे
  • पाणी पीठ मळण्यापुरते

कृती:

मिस्सी रोटी

मिस्सी रोटी

कणिक व बेसन एकत्र करून बाकी सर्व मसाले टाका.

एक मोठा चमचा तूप व पाणी टाकून पीठ मळून घ्या.

अर्धा तास ओल्या कापडाने झाका पीठाचा एक मध्यम आकाराचा पेढा घेऊन पोलपाटावर लाटण्याने लाटा गरम तव्यावर दोन्ही बाजूने भाजा.

एक बाजू पूर्ण तव्यावर भाजा व दुसरी थोडी भाजून झाल्यावर गॅसवर फुलवा.

गरमागरम तूप लावून वाढा.