मिक्स फ्रुट

साहित्य :

  • ७-८ काजूचे तुकडे
  • ७-८ बदाम
  • १५-२० मनुका
  • ४-५ सुकलेल्या अंजिराचे तुकडे
  • २ सफरचंद
  • १ केळे
  • २ मोसंबी
  • २ संत्री
  • ४ आंबे

कृती :

प्रथम आंब्यांचा गर काढून घ्यावा. तो दुधात घालावा. त्यात बर्फाचा चुरा व चवीनुसार साखर घालून हे मिश्रण मिक्सरमधून काढावे. मग हे मिश्रण ग्लासमध्ये ओतून त्यात काजू, बदाम, मनुका, अंजीर, सफाचंद, केळी, मोसंबी व संत्री यांचे तुकडे घालावेत. काजू, बदाम यांचा उपयोग वरील सजावटीकरीता करावा.