मिक्स फ्रुट सरबत

साहित्य :

  • १ मध्यम आकाराचे कलिंगड
  • १ लहान टरबुज
  • अननस
  • संत्र
  • ३ चमचे आल्याचा रस
  • सेव्हन‍अप किंवा लिम्का अर्धी बाटली
  • साखर

कृती :

कलिंगडाच्या बिया काढून त्याच्या फोडी मिक्सरमधून काढा, अननस, संत्री, टरबुज यांचा प्रत्येकी १ वाटी रस काढा, हे रस एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून आवश्यकतेनुसार साखर घालून ढवळून घ्या. सर्व्ह करताना कोल्ड्रिंकमध्ये हा रस घालून वर कलिंगडच्या फोडी व बर्फाचा चुरा घालून द्या.