तीन दिवसांत मान्सूनच्या आगमनाची शक्यता

महाराष्ट्र राज्यात मान्सून सात दिवसांपासून ‘सुट्टी’ वर आहे. पण चिन्हे अशी आहेत की, आता तो राज्याच्या उर्वरित भागांतही दाखल होणार आहे. पुणे वेधशाळेचा अंदाज आहे की, पावसासाठी राज्यात हवामान अनुकूल आहे आणि येत्या तीन दिवसांत आणखी काही भागांत मान्सून पोहोचेल.

गेल्या आठवड्यात केरळला आंघोळ घातल्या नंतर दुसऱ्याच दिवशी मान्सूनने राज्यापर्यंतचा काही भाग व्यापला होता. मात्र त्यानंतर, मान्सूनसाठी हवामान प्रतिकूल होते आणि त्यामुळे त्याच्या प्रगतीत खंड पडला. पण आता लगेचच मान्सून राज्यात दाखल होईल. वेधशाळेने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकचा अंतर्गत भाग, तमिळनाडू आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांतही वातावरण पोषक असल्यामुळे मान्सून दाखल होणार आहे.

हवामान विभागाच्या उप-महासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले की, ‘कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरासह उत्तर महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत निर्माण झाले आहे. मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीलगत चक्रीवात स्थिती निर्माण झाल्यामुळे वाढेल. राज्याच्या अंतर्गत भागातील पावसासाठी हवामानाची ही स्थिती पोषक आहे. यामुळे आणखी काही भागांत मान्सूनची प्रगती होईल.’

मान्सूनन मे महिन्यात केरळमध्ये दाखल झाल्यानंतर एका अठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सूनने केरळमध्ये उशीरा हजेरी लावल्यानंतरही राज्यापर्यंतचा प्रवास वेगाने केला. पण हवामान प्रतिकूल नसल्याने मान्सूनचे आगमन लांबले.