मुगाची खडी डाळ

साहित्य:

  • १ वाटी सालासकट मुगाची डाळ
  • अर्धा चमचा मीठ
  • १ लवंग
  • १ वेलदोडा
  • १ जायपत्रीचा लहान तुकडा
  • अर्धा चमचा जिरे
  • १ चमचा साजूक तूप

कृती :

डाळ धुवावी व तुपाखेरीज सर्व जिन्नस घालावे. अडीच वाट्या गरम पाणी घालून डाळ कुकरमध्ये किंवा पातेल्यात शिजवावी. साध्या भाताबरोबर ही डाळ व कढी छान लागते. डाळ पळीएवढी घट्टसर असावी. आवडीनुसार या डाळीत साधा शिजलेला भात मिसळावा व गरम डाळभात खावा. किंवा वेगवेगळे वाढून घेऊन चमचाभर तूप घालून खावी. वाढण्यापूर्वी गरम डाळीचा एक चमचा साजूक तूप घालावे.