मुळशी नवे हिल स्टेशन

मुळशी नवे हिल स्टेशन

मुळशी नवे हिल स्टेशन

आणखी एक नवे हिल स्टेशन पुणे जिल्ह्यात राजकीय आशिर्वादाने उभे करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून त्यासाठी अधिसूचना जारी झाली असून, हे मुळ्शी तालुक्यातील दुसरे खासगी हिल स्टेशन असेल.

मे महिन्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे हिल स्टेशन उभारण्यासाठी परवानगी दिली होती. हा प्रकल्प मुळशी तालुक्यातील मौजे सालतर, माजगाव बार्पे बुद्रुक, भांबर्डे, एकोले, घुटके, आडगाव या गावातील जमिनींवर उभा राहणार आहे. तेथे टुरिस्ट रेसॉर्ट्स, हॉलिडे होम, टाऊनशिप, गिरीस्थान धोरणानुसार बांधण्यात येणार आहे. १९ मे ला या हिल स्टेशनबाबत अधिसूचना करण्यात आली असून, या अधिसूचनेत असेही म्हटले आहे की मुळशी तालुक्यातील शेती आणि ‘ना विकास झोन’ असलेल्या जमिनी हिल स्टेशनसाठी योग्य आहेत. जमिनींच्या फेरबदलासही परवानगी देण्यात येणार आहे, नगररचना विभागाच्या उपसंचालकांनी पर्यटनास चालना देण्यासाठी हे मत व्यक्त केले.