मटार पूरी

साहित्य:

 • १ वाटी मैदा
 • १ वाटी कणिक
 • दीड वाटी वाटाणा
 • २ हिरव्या मिर्च्या
 • थोडीशी कोथींबीर
 • २ मोठे चमचे दही
 • १/२ लहान चमचा बेकींग पावडर
 • १/२ लहान चमचा जीरे
 • १ लहान चमचा आंबट पावडर
 • १/२ लहान चमचा साखर
 • मीठ चवीप्रमाणे
 • तळण्याकरता तूप

कृती:

मटार पूरी

मटार पूरी

मैदा व कणिक एकत्र करून मीठ, साखर, तूप टाका, एका वाटीत दही व बेकिंग पावडर एकत्र करुन पाण्याने कणिक चांगले मळा, तीन तास कणिक झाकून ठेवा. मटार उकडून घ्या. हिरवी मिरची व कोथींबीर टाका. थोडेसे परतून गॅस बंद करा. मळलेल्या मैदेचा १ पेढा घ्या. थोडासा लाटून मटारचे मिश्रण मधोमध भरा व बाजूचे पीठ ताणून मिश्रण झाका व लाटा. कढईत तूप गरम करून या पुर्‍या तळा व गरम वाढा.