नाचणीचे सरबत

साहित्य :

  • ४ कप पाणी
  • ८ टी-स्पून नाचणी पीठ
  • थंड ताक
  • मीठ
  • जिरे पावडर

कृती :

चार कप पाण्यात नाचणी पीठ घालून ते शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर त्यात थंडगार ताक घालावे. त्यात जिरे पावडर व चवीनुसार मीठ घालून हे पेय ग्लासमध्ये सर्व्ह करावे.