नाणी

दक्षिणेचेपहिले सम्राट सातवाहन यांची नाणी महाराष्ट्रात नाशिक, नेवासे , कोल्हापूर, तेर, कर्‍हाड, पैठण, चांदा व तऱ्हाळे इ. अनेक ठिकाणी सापडली आहेत. सातवाहनानी मुख्यत्वे तांब, जस्त इत्यादी धातूंचा उपयोग केला असून, चांदीचा वापर वसिष्ठीपुत्र पुलुमावी (इ. स. १३० ते १५९), वसिष्ठीपुत्र शतकर्णी (इ. स. १५९ ते१६६) व गौतमीपुत्र श्री यज्ञ चित्रीत केलेली थोडी नाणी सापडली आहेत. सातवाहन नाण्यांवर बैल, हत्ती व सिंह यासारख्या प्राण्यांच्या कोरलेल्या अक्षरांसहित आकृती एका बाजूला असून दुसऱ्या बाजूला साधारणतः पार बांधलेले झाडा, मासा, वृषभ, नदी, नंदीपाडा व उज्जैन पद्धतीचे स्वस्तिक या प्रकारची चित्रे आहेत. सातवाहनकालीन नाण्यांच्या बाबतीत असे वाटते की शिक्का मारण्यासाठी वापरलेला साच्याचा आकार नाण्यांपेक्षा मोठा असावा. परिणामी चित्रे व अक्षरे अपुरी उमटली आहेत. चित्रे ठराविक ठशाची असली तरी मुद्दाम उल्लेख करण्याइतकी स्पष्ट आहेत. काही सातवाहन नाण्यांवर दोन डोलकाठींचे जहाज असून त्यावेळी समुद्रमार्गे व्यापार चालत होता त्याचा ती पुरावाच देतात.

वर जाड अक्षरे आहेत अशा साच्यातून काढलेल्या शिशाच्या अनेक जड कुरा नाण्यांवर (दुसरे शतक) एका बाजूला धनुष्यबाण व दुसऱ्या बाजूला पार बांधलेले झाड दर्शविले आहे. ही नाणी कोल्हापूर येथे व सातारा जिल्हयात नेर्ले येथे सापडली, वसिष्ठीपुत्र, गौतमीपुत्र व मदारीपुत्र (दुसरे शतक) या तीन राजांची ही नाणी असल्याचे उघड‍उघड दिसते. विलिवय्कुर हे उपपद लावून मातृवंशीय नांवे ते वापरतात. काही विद्वान त्यांना सातवाहनांचे मांडलिक मानतात तर इतर विद्वान त्यांना कुरा दिंवा अंकुरा राजघराण्याचे समजतात. कोल्हापूरला उत्खननात मिळालेल्या नाण्यांच्या अलीकडील अभ्यासावरून असे दिसते की कुरा हे प्रारंभीच्या सातवाहनाना समकालीन होते. ब्रह्मपुरी (कोल्हापूर) येथील साठ्यात अर्था, एक तृतीयांश व एक चतुर्थांश कापलेले अनेक कुरा नाणी मिळाली आहेत. चिल्लर नाणी म्हणून त्यांचा उपयोग होत असावा हे उघड आहे.

महाराष्ट्राच्या काही भागावर चुटु राजघराण्याने राज्य केले असावे (दुसरे शतक). त्यांची नाणी शिशाची असून त्यावर एक बाजूला एकामागे एक असे तीन डोंगर व दुसऱ्या बाजूवर पार बांधलेले झाड आहे. ही नाणी बहुतांशी महाराष्ट्राचा सीमेजवळच्या प्रदेशाअ सापडली आहेत. कोल्हापुरला मिळालेली शिशाची नाणी कुरा नाण्यांशी मिळतीजुळती आहेत. कारन त्यांच्यावरली चित्रे तीच आहेत.

महाराष्ट्रात फारच क्वचित क्षत्रप आणि क्षहराट नाणी सापडली आहेत. क्षहराट कुळातील व शक राजघराण्यातील नहपना (इ.स. ११०-१२४) या राजाची, जोगळथंबी येतील साठ्यात १९०५ साली मिळलेली १३,२७० चांदीची नाणी सोडता इतर काहीही साठे सापडलेले नाहीत. गौतमीपुत्र शतकर्णी (इ.स.१०६-१३०) या सातवाहनाच्या सुप्रसिद्ध राजान नहपना या समकालीन शक राजकर्त्याला ठार मारून त्याचा मुलुख काबीज केल्यावर त्याची चांदीची नाणी पुन्हा पाडली असावी हे याचे एक कारण असू शकेल

इसवी सनाच्या पहिल्या तीन शतकात दक्षिणेच्या बंदरांतून रोमबरोबर व्यापारी संबंध प्रस्थापित झाले आणि कदाचित त्यांचा दागिने म्हणूनही उपयोग करण्यात आला. कोल्हापूर, नेवासे, तेर, पैठण व कोंडापूर येथेही अशी नकललेली नाणी सापडली आहेत, ही नाणी भोके पाडालेली व गोल आकाराची असुन त्यांच्यावर ठिपक्यांच्या किनारीमध्ये राजाचे मस्तक व त्याचप्रमाणे रोमन देवता चित्रीत केलेल्या असत. टायसेरिय्सच्या काही नण्यांची नक्कल करणारी खूप नाणी सापडली आहेत.

सातवाहनाच्या अस्तानंतर लवकरच त्रैकूटक ( इ.स. तिसरे शतक ) प्रसिद्धीस आलेले दिसतात. महाराज इंद्रदत्त हा माहित असलेला पहिला त्रैकूट राजा असून त्याच्या नावाचा उल्लेख त्याचा मुलगा महाराज धरसेन याच्या नाण्यावरील अक्षरात आहे. त्रैकूटक नाण्यांचे पश्चिम क्षत्रप नाण्यांशी पुष्कळ साम्य आहे.