नाणी

इ.स. १७१३-१८१८ मध्ये महाराष्ट्राचा कारभार चालवणारे पेशवे त्या भागाचे प्रत्यक्षतः राज्यकर्तेच होते. मोगल नाण्यांच्या धर्तीवर त्यांनी चांदीची नाणी सुरू केली आणि त्यावरील मोगल राज्यकर्त्यांची नावे मोगल व पेशव्यांच्या प्रतीका समवेत कायम ठेवली. ही नाणी मुख्यतः मुहियाबाद (पुणे) इथली आहेत. इतर अनेक टाकसाळीतही मराठ्यांनी नाणी पाडली. पेशव्यानी सुरू केलेल्या तांब्याच्या नाण्यांची छाननी पूर्ण व्हायची आहे. पेशव्यांच्या काळात सोनाराना नाणी पाडण्यासाठी परवाने देण्यात आले. पखान्याचे शुल्क म्हणून प्राप्तीतला काही भाग सरकारत भरायचा असे. नाणिइ पाडण्याचा नेहमीचा मोबदला दर हजारी सात नाणी. सरकारला सहा व टाकसाळीच्या व्यवस्थापकाला एक असा असे. पेशव्यांच्या अमदानीत काही इलाख्यातील जमीनदारानी स्वतःच्या टाकसाळी सुरू करून बनावट नाणी पाडली.

इंग्लंडचा दुसरा चार्ल्स याच्याबरोबर पोर्तुगालची राजकन्या ब्रॅगन्झाची कॅथरिन काळात (इ.स. १५३९-१५४५) सुरू केलेल्या मोगल धर्तीच्या रुपयाला सदृश अशी व दुसरा जेम्स आणि विल्यम आणि मेरी यांच्या राज्यारोहण सालांची नाणी प्रयोग म्हणून सुरू करण्यात आली. पण ती लोकप्रिय न ठरल्याने मागे घेण्यात आली. युरोपीय धर्तीची नाणी मुंबईत १७१७ सालापर्यंत पाडली जात होती. १७१७ ते १७७८ पर्यंत मोगल तऱ्हेचा मुंबईचा रुपया हे पश्चिम भारतीय व्यापाराने मुख्य चलन होते. १८१५ साली ईस्ट इंडिया कंपनीने सर्व टाकसाळ काम सुरतेहून मुंबईला हलवले. चवथ्या विल्यमच्या कारकीर्दीपासून (१८३५) ते सहाव्या जॉर्जच्या कारकीर्दीपर्यंतच्या अव्वल इंग्रजी अम्मलातील नाण्यांची विभागणी दोन भागात करता येईल. इ,स, १८३५ ते १८५८ (१८६२) पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच्या अमलाखाली पाडलेली नाणी, आणि १८६२ ते १९४७ पर्यंत बादशहाच्या आधिपत्याखाली पाडलेली नाणी.

चवथ्या विल्यमच्य रुपयाची चलनी किंमत इंग्रजी, बंगाली, फारशी व देवनागरी अक्षरात मागल्या बाजूला लिहिलेली असे. १८३५ ते १८४० या काळातल्या रुपयांवर १८३५ हेच साल होते, व्हिक्टोरिया राणीची प्रतिमा असलेल्या नाण्यावर मस्तकाचे दोन प्रकारचे रेखाटन एका बाजूवर असणारी नाणी होती व त्यांना टाईप १ व टाईप २ म्हणते. पहिल्या प्रकारच्या नाण्यांवर त्य बाजूवर एकसंध अक्षरे होती. ही नाणी १८४० ते १८५१ या काळात सुरू केली होती तर १८५० ते १८६२ या काळात सुरू केलेल्या नाण्यांवर त्याच बाजूवर विभागलेली अक्षरे होती. १८६२ साली पाडलेले रुपये त्यावरील साल न बदलता १८७४ पर्यंत पाडले जात होते. १८८३ साली टाकसाळीत नाणे पाडल्याचे अचूक वर्ष दाखवण्यासाठी साच्यावर टिंबे किंवा मणी भरीला घालण्याची पद्धत मुंबई टाकसाळीने अवलंबिली.

ईस्ट इंडिया कंपनीने काही काळ मोगल नाण्यांच्या नकला केल्या. त्याल कायदेशीर स्वरूप देण्याकरता १६८६ साली दुसऱ्या जेम्सकडून तद्देशीय नाण्यांच्या नकला करण्याची त्यंनी परवानगी मिळवली. फार आग्रहांनतर फरुखसियार या मोगल राजाने (इ.स. १७१३ ते १७१९) १७१७१ साली आपली नाणी मुंबईत पाडण्याला कंपनीला सम्मती दिली. देव्हापासून १७७४ पर्यंत मोगल राजांच्य़ा नावाची मुंबईच्या टाकसाळीचे नाव धारण करून बाहेर पडत होती.

१८३५ सालच्या चलनविषयक सुधारणेप्रमाणे ठराविक वजनाचा, आकाराचा व शुद्धतेचा रुपया हे ब्रिटिश सत्तेखालील सबंध भारताचे एकमेव चलन झाले. एकूण १८० ग्रेनपैकी १६५ गेन शुद्ध चांदी असणारा असा हा कंपनीचा रुपया होता. या वेळेपासून तीस रुपये किमतीची दुप्पट मोहोर, १५ रुपये किमतीची मोहोर, दहा व पाच रुपये किमतीची सोन्याची नाणी व रुपया, अधेली (अर्धा रुपया) व पावली (पाच रुपया) या चांदीचा नाण्यावर एका बाजूला चौथ्या विल्यम राजाची ( इ.स.१८३०-१८३७) प्रतिमा व नाव दिसू लागले. सोन्याच्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सिंह, नारळाचे झाड व चलनी इमत इंग्रजी व फारशी लोपीत कोरलेली असे. चांदीच्या नाण्यांची चलनी किंमत पुष्पमालेच्या आत दर्शवणारा जात असून ईस्ट इंडिया कंपनीचे नाव व तारीखही असे.