नाणी

चौथ्या विल्यमनंतर त्याची भाची व्हिक्टोरिया १८३७ साली राणी व्हिक्टोरिया (इ.स. १८३७-१९०१) म्हणून गादीवर आली इंग्लंडहून नवे साचे आणण्यात विलंब झाल्यामुळे तिच्यानावाची नाणी १८४० पासून प्रचारात आली. व्हिक्टोरिया राणीचे रुपये दोन प्रकारचे होते. मुकटविरहित मस्तक दर्शवणारा रुपया१८४० पासून सुरू झाला, व वक्षापासून मस्तकापर्यंत मुकुटधारी प्रतिमा असणारा, १८६२ पासून सुरू झाला. १ जानेवारी १८७७ रोजी राणीने एम्प्रेस ऑफ इंडिया किंवा ‘भारताची सम्राज्ञी’ हा किताब धारण केला.

तिचा मुलगा सातवा एडवर्ड (इ.स. १९०१ ते१९१०), नातू पाचवा जॉर्ज (१९१०-१९३६) , पणतू आठवा एडवर्ड (१९३६) आणि सहावा जॉर्ज (१९३७-१९५३) हे सर्व तिचे वारस होते. आठव्या एडवर्डच्या नावाचा रुपया सुरू झाला नाही.

पैसा, ढबू पैसा आणि पै ही तांब्याची नाणी या नाण्यांबरोबर सुरू करण्यात आली. तांब्याच्या नाण्यांच्या एका बाजूवर तारखेबरोबर कंपनीची मुद्रा आणि तारिख असे. नण्यांची चलनी किंमत फारशी व इंग्रजी मोपीत पुष्पमालेच्या आतमध्ये कोरलेली असे व नाण्यांच्या कडेने ईस्ट इंडिया कंपनीचे बोधचिन्ह असे. सन १८४१ साली दोन आण्याचे (चवली) नवे चांदीचे नाणि सुरू करण्यात आले. १९०६ किंवा १९०९ साली षटकोनी आकाराचे निकलचे नवे एक आण्याचे नाणे सुरू करण्यात आले.

चांदीची अधेली, पावली व चवली ही नाणी १९१८ साली बंद करण्यात येऊन त्याऐवजी तांबे-निकल मिश्र धातूची नाणी सुरू झाली. पण तांबे-निकल मिश्रणाची अधेली १९१९ साली व पावली १९२१ साली बंद झाली व ती नाणी पुन्हा चांदीची पाडण्यात येऊ लागली. तांबे-निकल मिश्रणाची चवली व एक आणा ही नाणी बंद करून त्याऐवजी अ‍ॅल्युमिनियम व ब्रॉन्झ या मिश्रणाची नाणी १९४२ साली सुरू होऊन १९४६ पर्यंत चालली. चांदीच्या तुटवड्यामुळे १९४५ साली चांदीची नाणी बंद करून१९४६ सालापासून तांबे-निकल मिश्रणात सुरू झाली. पितळ-निकल मिश्रणाचि नवे अर्ध्या आण्याचे नाणे १९४२ साली सुरू झाले. मध्यभागी भोक असलेला नवा पातळ नवा पैसा १९४३ साली सुरू झाला. इंग्रजी अमदानीतली रानी व्हिक्टोरियपासून सहाव्या जॉर्जपर्यंतची नाणी १९४७ पर्यंत पाडली गेली आणि भारत स्वतंत्र झाल्यावर ती पाडण्याचे थांबवण्यात आले.