राज्यकर्त्यांनी स्वतः मध्ये बदल करावेत

 नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

आज देशात सर्वत्र निराशाजनक स्थिती आहे. नागरिकांमधला उत्साह खूप कमी झाला आहे. मात्र, राज्यकर्त्यांनी जर ठरविले तर त्याच परिस्थितीचा विकास होऊ शकतो, असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या ‘त्रि-दशकपूर्ती’ निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते व यांचे उद्घाटन मोदींच्या उपस्थितीत करण्यात आले. यानिमित्त ‘सु-शासन ही सूत्र है’ या विषयावर मोदी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ते बोलत होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे, रेखा महाजन, प्रताप आशर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे अध्यक्ष खासदार गोपीनाथ मुंडे होते.

मोदी यांनी संगितले की, आज आपण सर्वत्र घोर निराशा बघत आहोत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी राज्यकर्त्यांनी स्वतः मध्ये काही बदल केले पाहिजे. यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. सध्या अस्तित्वात असलेले नियम, कायदे, प्रशासन आणि शासकीय अधिकारी तेच असतानाही परिस्थितीत बदल घडला जाऊ शकतो.

नरेंद्र मोदी यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी पुणेकरांनी कार्यक्रमापूर्वीच अर्धा ते एक तास अगोदरच बालगंधर्व रंगमंदिरात उपस्थिती लावली होती. जय श्रीराम, जय हनुमान, हरि विठ्ठल, ज्ञानदेव-तुकाराम अशी घोषणाबाजी मोदी यांच्या आगमनानंतर झाली.