खचदरी मधून नर्मदा नदी वाहते.
नर्मदा :- ही नदी पूर्व-मध्य मध्यप्रदेशातील मैकाला डोंगरांमध्ये उगम पावून नागमोडी वळणे घेत मांडला टेकड्यामधून वाहते. ही नदी मार्बल रॉक्स (संगमरवराचे खडक) जवळ विंध्य आणि सातपुडा पर्वतांमुळे तयार झालेल्या घळीतून पुढे पश्चिमेला वळून मध्य प्रदेश, गुजरातेतून वाहत भडोचजवळ २१ कि.मी. रुंद मुखामार्फत खंबायतच्या आखातला मिळते.