नवरतन कोरमा

साहित्य:

 • १०० ग्रॅम पनीर
 • १०० ग्रॅम गाजर व बटाटे चौकोनी चिरलेले
 • १०० ग्रॅम मटार व घेवडा चिरलेला
 • ३ टॉमेटो
 • २ कांदे
 • १ लहान चमचा आल्याची व लसूण पेस्ट
 • १/२ लहान चमचा हळद
 • २ लहान चमचे धणे पावडर
 • १/२ लहान चमचा लाल तिखट
 • १/२ लहान चमचा गरम मसाला
 • १ कप दूध
 • ३ मोठे चमचे क्रीम
 • ३ चमचे तूप
 • मीठ चवीप्रमाणे
 • ५० ग्रॅम काजू
 • चांदी वर्क १ पान

कृती:

नवरतन कोरमा

नवरतन कोरमा

गाजर व बटाटे लहान चिरुन उकडून घ्या. मटार सोलून घ्या. घेवडा बारीक चिरा. पनीर लहान चौकोनी तुकडे करुन, तळून घ्या.

कांदा मिक्सरमधून काढा व टॉमेटो १० मिनीटे गरम पाण्यात टाकून साल काढा व टॉमेटो विरुन घ्या. आले व लसूनची पेस्ट तयार करा.

कढईत तूप गरम करा व कांदा टाकून परता नंतर आले लसूण पेस्ट व टॉमेटो टाकून परता, धणे पावडर, तिखट, गरम मसाला व मीठ टाका.

परता जोपर्यंत ग्रेव्ही तूप सोडेल दूध टाकून मिक्स करा आता याच्यात पनीर, गाजर, बटाटा, मटार व घेवडा टाका. काजूचे तुकडे टाकुन थोडे पाणी टाका.

गॅस बंद करून क्रीम टाका व चांदीच्या वर्कने सजवून गरम वाढा.