साहित्यः
- १०० ग्रा. सोयाबीन
- १०० ग्रा. गाजर
- १०० ग्रा. बटाटे
- १००ग्रा फुलकोबी
- १०० ग्रा. शिमला मिरची
- १०० ग्रा. पनीर
- १०० ग्रा. काजू
- १०० ग्रा. मनुका
- १०० ग्रा. हिरवी मिरची
- २ टोमॅटो
- एक मोठा चमचा दही
- ४ मोठे चमचे तूप
- मीठ
- साखर
- स्वादाप्रमाणे चांदीचा वर्क
- अननसाचे तुकडे व थोडी चेरी सजावटी साठी
कृतीः

नवरत्न करी
सर्व भाज्यांना छोटे-छोटे तुकडे करून कापावे, सोयबीन, गाजर कोबीला उकळावे.
बटाटे व पनीर शिमला मिरची मध्ये कापावी तसेच टोमॅटोला पाण्यात वाटावे, दह्याला घुसळावे.
कढईत तूप गरम करून सर्व वाटलेले मसाले भाजून घ्यावे, भाज्या, काजू, मनूके, बटाटे, पनीरचे तुकडे, मीठ, साखर गरम मसाले टाकावे व थोड्या वेळ शिजवावे.
अननसाचे तुकडे, चेरी व चांदीचा वर्क याने सजवावे.