निमकी

साहित्य :

  • ३ वाट्या मैदा
  • २ चमचे कलौजी (कांद्याची बी)
  • १ चमचा साखर
  • १ चमचा मीठ
  • ३ टे. चमचा कडकडीत डालडाचे मोहन.

कृती :

सर्व एकत्र करून गरम पाण्यात पीठ भिजवा. नंतर थोड्या वेळाने मळून घ्या.जाडसर पुऱ्या लाटा. प्रत्येक पुरीला जेवायच्या काट्याने भोके पुन्हा म्हणजे पुरी फुगणार नाही व मंदाग्निवर तळा.