मान्सूनच्या निष्क्रियतेमुळे जून गेला कोरडा

पावसाचा निष्क्रियतेपणा

पावसाचा निष्क्रियतेपणा

पावसाने सुट्टी घेतल्यामुळे राज्यभरात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याचे पावसाच्या आकडेवारीवरून समजते. १ ते २७ जून या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या चारही विभागात पावसाची नुसती सरच दिसली. जूनमध्ये पावसाने राज्यातील ३५ पैकी फक्त सात जिल्ह्यांमध्ये आपली सर दाखवली.

सुरुवातीपासूनच मान्सूनने आपल्या कामात निष्क्रियता दाखवल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच पावसाच्या अभावामुळे खरीपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आकडेवारी केली होती. त्यानुसार जूनच्या सरासरीपेक्षा कोकणात १४ टक्के पाऊस कमी पडला आहे. हेच प्रमाण मध्य महाराष्ट्रात ५२ टक्के आहे तर ६० टक्के पाऊस मराठवाड्यात कमी पडला आहे. या आकडेवारीतून दिसून येते की, जूनच्या सरासरीच्या २० टक्के पाऊस विदर्भात कमी पडला आहे.

राज्यात १३ जिल्हे असेही आहेत जेथे सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही पाऊस कमी पडला आहे. ३० टक्क्यांपेक्षाही सरासरीचा पाऊस मुंबई, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात पडला आहे.