स्वाइन फ्लूची लागण नाही

स्वाइन फ्लूची लागण नाही

स्वाइन फ्लूची लागण नाही

‘गेल्या दीड वर्षांपासून संसर्ग होणारा विषाणू स्वाइन फ्लूचा नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) नॅशनल कम्युनिकेबल डिसीज कंट्रोलने (एनसीडीसी) मान्य केले आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूची ही साथ ‘पॅन्डेमिक’ स्वरुपाची नाही. पूर्वीपासूनच हा फ्लूचा विषाणू अस्तित्वात आहे. ‘पॅन्डेमिक स्वाइन फ्लू’ हे नाव साथ आल्यानंतर त्याला दिले गेले. यापूर्वीही फ्लूने मृत्यू झाले आहेत. एखादी व्यक्ती जर स्वाइन फ्लूने गेली तर असे समजावे की ती व्यक्ती त्याच फ्लूची बळी आहे. असे म्हणणे चुकीचे आहे की फ्लूची लागण झाल्यानंतर स्वाइन फ्लूची लागण होते. मुळात फ्लूचे अनेक पेशंट पावसाळ्यात व हिवाळ्यात आढळतात. त्यामुळे सध्याचे पेशंट स्वाइन फ्लूचे नसून साध्या फ्लूचेच आहेत,’ असे मुंबईचे हाफकीन प्रयोगशाळेचे संचालक डॉ. अभय चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.