ओझोनचे महत्व

ओझोन या वायूचे महत्व सर्वप्रथम १९४० साली मानवजातीच्या लक्षात आले. हा नैसर्गिक पद्धतीने निर्माण होणारा प्राणवायू पृथ्वीपासून १० ते ४० कि.मी. अंतरावर ९०% हा वायू असल्यामुळे सूर्यप्रकाशामार्फत येणारे हानीकारक अल्ट्राव्हायलेट किरण शोषून घेऊन मानवजातीची, वनस्पतीची, प्राण्याची व जिवसृष्टीची हानी टाळतो.

सन १९८० पासून पृथ्वीचे तापमान वाढत चालले. औद्योगिक क्रांती सूरू झाल्यानंतर कोळसा, नैसर्गिक वायू खनिज तेले यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. जंगल तोड जाळपोळ, सिमेंट उत्पादन या सर्वामुळे वातावरणात प्रचंडा कर्बव्दिप्राणित वायू फेकला जाऊ लागला. औद्योगिक क्रांती अगोदर वातावरणातील कर्बद्विप्राणित वायूचे प्रमाण २६० पी.पी.एम.व्ही होते आता ३५० पी.पी.एम.व्ही. पेक्षा जास्त झाले आहे.

विविध तेलांच्या ज्वलनामुळे मिथेनचे प्रमाण वाढले, हायड्रोद्कार्बन पद्धतीच्या ज्वलनामुळे नायट्रस ऑक्साईड प्रमाण वाढले. रेफ्रिजटस, वातानुकूलित घरे, ऑफिसे, कारखाने यांच्या वापरामुळे गेल्या पन्नास वर्षात क्लोरोक्लुरा कार्बन्स हा हरितगृह वायू वातावरणात सोडला जात आहे. प्रत्येकाचा परिणाम खूपच मोठा असतो.

ओझोनच्या संरक्षक कवचाला अनेक ठिकाणी भोके पडलेली आहेत जगापूढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अल्ट्राव्हायोलेट-बी किरण जर पृथ्वीवर पोचले तर पूर्ण जिवसृष्टीचा विनाश होईल तेव्हा मानवाने वेळीच आवर घालणे गरजेचे आहे मानवाला निसर्गाने दिलेली प्रतिकार शक्ती ओझोन अभावी कोसळू शकते. तेव्हा ओझोन थर पातळ होणे यांचे तुम्हा आम्हा सर्वासमोर आव्हान आहे.