कांद्याचा पराठा

साहित्य:

  • २ वाटी कणिक
  • ६ कांदे
  • १ लहान चमचा वाटलेली बडीशेप
  • २ लहान चमचे मीठ
  • १/२ लहान चमचा लाल तिखट
  • १/२ लहान चमचा गरम मसाला
  • तूप आवश्यकतेनुसार

कृती:

कांद्याचा पराठा

कांद्याचा पराठा

कांदा चिरुन घ्या. एका कढईत दोन मोठे चमचे तूप गरम करून कांदा परता. गुलाबी परतल्यावर गरम मसाला, लाल तिखट, बडीशेप व मीठ टाका. गॅस बंद करा. कांदा एकदम गार होऊ द्या. कणिक मीठ टाकून नेहमीप्रमाणे मळून घ्या. अर्धा तास झाकून ठेवा. आता पिठाचे लहान-लहान पेढे करुन लाटा. १ पेढा पोळपटावर लाटा. थोडा लाटून त्याच्यावर तूप लावा. थोडेसे कांद्याचे मिश्रण मधोमध ठेऊन बाजूने पीठ ताणून मिश्रण झाका व लाट, दोन्ही बाजू तव्यावर तूप लावून चांगल्या भाजा.