पाकाशिवाय तिळाचे लाडू

साहित्य :

  • २ वाट्या भाजलेल्या तिळाची पूड
  • १ वाटी दाण्याचे कूट
  • २ वाट्या किसलेला गूळ
  • ७-८ वेलदोड्याची पूड
  • अर्धी वाटी तूप

कृती :

पाकाशिवाय तिळाचे लाडू

पाकाशिवाय तिळाचे लाडू

परातीत तूप घालून फेसून घ्या.

नंतर गूळ घालून फेसा.

नंतर त्यात वेलदोड्याची पूड, तिळाची पूड व दाण्याचे कूट घाला.

मिश्रण सारखे करा व छोटे छोटे लाडू वळा.