पाकोळी आणि कावळा

एक पाकोळी आणि एक कावळा यांच्यात परस्परांचा सौंदर्यासंबंधाने वाद चालला हाता. बोलता बोलता कावळा पाकोळीस म्हणाल, ‘तुझे सौंदर्य फक्त उन्हाळ्यात पहावे, पण माझे सौंदर्य तसे नाही, ते सदासर्वदा सारखे असते.

तात्पर्य:- दोन सुंदर वस्तूंपैकी जिचे सौंदर्य फार दिवस टिकेल ती अधिक उपयोगी म्हटली पाहिजे.