पालक पनीर

साहित्य:

  • १ कि. पालक
  • २०० ग्रा. पनीर
  • एक मोठे टोमॅटो
  • एक कांदा
  • ४ पाकळी लसूण
  • एक तुकडा आले
  • ५०० ग्रा. दही
  • बेसन मीठ
  • मिरची
  • तूप अंदाजे

कृतीः

पालक पनीर

पालक पनीर

बेसन भाजून वेगळे ठेवणे, पालक धुवून कापावे, कांदा, लसूण व आले वाटून घेणे, टोमॅटो सोलून कापावे, पनीरचे छोटी तुकडे कापून तळावे.

कुकरमध्ये मीठ व पाणी टाकून पालक उकळावे. उकळलेला पालक पाणी गाळून वेगळा करणे. तसेच पालक वाटून घ्यावे. आता भांड्यात तूप गरम करून त्यात कांदा लाल होईपर्यंत भाजणे. नंतर त्यात अद्रक लसुण, टोमॅटो , लाल मिरची टाकून भाजावे.

आता यात बेसन व दही मिसळावे. आता वाटालेला पालक व तळलेले पनीर टाकुन हलवावे. तसेच पालकाचे काढलेले पाणी टाकावे. ५ मिनिटांनंतर उतरून घ्यावे आणि कोथिंबीर व पनीर याने सजवावे.