पंचमेल सब्जी

साहित्यः

 • २५० ग्रॅम बटाटा
 • ४ वांगी
 • २०० ग्रॅम दूधी
 • १५० ग्रॅम वाटाणे
 • १ गड्डी कोथिंबीर
 • ३-४ हिरव्या मिरच्या
 • थोडासा गरम मसाला
 • धणे पावडर
 • लाल तिखट
 • काळी मिरी
 • मेथी दाणा
 • जीरे
 • कांदाच्या बीया
 • बडीशेप
 • १०० ग्रॅम दूध
 • लाल तिखट पावडर
 • तूप फोडणीसाठी

कृतीः

पंचमेल सब्जी

पंचमेल सब्जी

तूप कढईत टाकून फोडणी द्या. मसाले परतून झाल्यावर कोथिंबीर व मिरची चिरून टाका. थोडा वेळ परतून सर्व भाज्या चिरून टाका. मीठ व बाकी मसाले टाकून परता. भाजी थोडी शिजल्यावर दूध टाका. आता कढई झाकून भाजी शिजवा. गॅस कमीवर ठेवा. पाणी शिजल्यावर गरम मसाला टाका व गरम गरम वाढा.