पंचरत्नी डाळ

साहित्य:

  • ५० ग्रॅम तूरडाळ
  • ५० ग्रॅम उडीद डाळ
  • जीरे
  • हिरव्या मिरच्या
  • २ टॉमेटो
  • हिंग
  • ५० ग्रॅम चणाडाळ
  • ५० ग्रॅम मूगडाळ
  • ५० ग्रॅम मसूरडाळ
  • आंबट पावडर
  • १ तुकडा आले
  • मीठ चवीप्रमाणे
  • हळद
  • धणे पावडर
  • कोथिंबीर
  • तूप

कृती:

पंचरत्नी डाळ

पंचरत्नी डाळ

सर्व डाळी निवडून, धुऊन पाणी टाकून तासभर ठेवा. एका पातेल्यात आवश्यकते प्रमाणे टाकून शिजवण्यासाठी डाळी टाका.

एक उकळी आल्यावर टॉमेटो व मीठ टाका. बाकी सर्व मसाले टाका.

सर्व डाळी शिजल्यावर गॅस बंद करा.

कढईत तूप गरम करून कांदा, आले, हिंग, जीरे परतून घ्या व याची डाळीला फोडणी द्या. कोथींबीर टाकून वाढा.