साहित्य:
- २०० ग्रा. पनीर
- १०० ग्रा. दही
- २५ ग्रा. मैदा
- लसूण
- १/२ चमचा जीरे पावडर
- १/२ चमचा गरम मसाला
- १ मिली. ऑरेंज कलर
- ५० ग्रा. बटर
- ७५ ग्रा. टोमॅटो
- ३० मिली. क्रीम
- १/२ चमचा लाल मिरची
- १/२ चमचा कसुरी मेथी
- मीठ
कृतीः

पनीर टिक्का
दह्यामध्ये ऑरेंज कलर, मैदा, मीठ, जीरे व गरम मसाला घुसळावा.
पनीरचे तुकडे तळावे, एका पातेल्यात लोणी टाकून त्यात अदरक-लसूण टाकून २ मिनीट भाजल्यावर कापलेले टोमॅटो, लाल मिरची पावडर टाकून परत भाजावे.
नंतर दही क्रीम टाकून भाजावे. त्याने तूप सोडल्यानंतर कस्तूरी मेथी टाकावी.
पनीर बाउलमध्ये जमवावे. नंतर क्रीम व कोथिंबीर सजवावे.