पनीरचे कालवण

साहित्य :

 • १ वाटी भरून पनीर
 • २ मोठे चमचे शेंगदाण्याचे भरड कूट
 • दीड वाटी डाळीचे पीठ
 • १ चमचा मीठ
 • अर्धा चमचा तिखट
 • ४-५ लसूणपाकळ्या
 • १ इंच आले
 • ४ हिरव्या मिरच्या
 • २ मोठे कांदे (वाटून घ्यावे)
 • २ मोठे चमचे खसखस
 • १ वाटी दही
 • पाऊण चमचा हळद
 • अर्धी वाटी टोमॅटोचा (शिजवलेला) रस
 • तेल

कृती :

आले-लसूण व मिरच्या एकत्र वाटाव्या. खसखस दोन तास भिजत ठेवून नंतर वाटावी. पनीर गोळे या पिठात बुडवून कढईत तळावे. कागदावर निथळावे.दुसऱ्या पातेल्यात पाच चमचे तेल तापले की त्यात कांद्याची वाटलेली गोळी घालावी. बदामीसर परतावी. त्यात आले-लसणाची गोळी व वाटलेली खसखस घालून मंद आंचेवर ४-५ मिनिटे परतावे. त्यात घुसळलेले वाटीभर दही, हळद, तिखट व मीठ घालावे. दोन वाट्या पाणी व टोमॅटो सॉस घालावे. मंद विस्त्वावर कालवण उकळू द्यावे. जरा दाट झाले की पनीरची गोळेभजी त्यात घालावी व खाली उतरवावे.